अनाथ हेल्थकेअर फाउंडेशन
“सेवा, संवेदना आणि सुरक्षित आरोग्य”
“सेवा, संवेदना आणि सुरक्षित आरोग्य”
About Us
अनाथ हेल्थकेअर फाउंडेशन ही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे कार्यरत एक नोंदणीकृत सामाजिक व सेवाभावी संस्था आहे. समाजातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वृद्धांची काळजी, खेळ, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जागृती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आम्ही झोपडपट्टी, ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो. विशेषतः बाल आरोग्य, किशोरवयीन मुली, महिला, अपंग व वंचित घटक यांच्यावर आमचा भर आहे.
आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास या तिन्ही घटकांचा समतोल साधून स्वावलंबी, सशक्त आणि निरोगी समाजनिर्मिती करणे हेच आमचे ध्येय आहे.